आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीची नणंद म्हणजेच विशाखा. अभिनेत्री पुनम चांदोरकर हीने विशाखाची भूमिका साकारली आहे. मालिकेत विशाखा हे पात्र रोज रोज दिसत नसलं तरी महत्त्वाच्या सीन्समध्ये विशाखा येऊन मालिकेला चार चांद लावून जाते. मालिकेत विशाखाला एक मुलगी आहे. पण आतापर्यंत फार कमी एपिसोडमध्ये तिची मुलगी दाखवण्यात आली आहे. खऱ्या आयुष्यातही अभिनेत्री पुनमला एक मुलगी असून तिनं देखील जाहिरातीत काम करण्यास सुरूवात केली आहे. आर्या असं पुनमच्या मुलीचं नाव असून ती नुकतीच बारावीची परीक्षा पास झाली आहे. आर्यानं नुकतीच तिची पहिली जाहिरात देखील शुट केली आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांच्याबरोबर तिनं ही जाहिरात केली. पुनमनं लेकीचं कौतुक करत तिचं पहिलं काम आपल्या सोशल मीडियावरून शेअर केलं आहे. नुकताच या मायलेकींचा बहरला हा मधुमास नवा या गाण्यावर ट्रेडिंग रील देखील पाहायला मिळाला.