अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर लेक स्वरालीबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय. मालिकेत नेहमी साडीत दिसणारी अरुंधती थोड्या हटके आणि स्टायलिश अंदाजात दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये मधुराणी सध्या थांबली आहे. तिथल्या महत्त्वाच्या ठिकाणी ती भेट देतेय. सीडनीच्या रेस्टॉरंटमधील मधुराणीचा कुल लुक. तिच्या हास्यानं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय. पिंक ड्रेस विथ मफलर आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात मधुराणीनं क्लिक केलेला सेल्फी. या फोटोत तिचा तरूण अंदाज दिसतोय. क्विन विक्टोरिया बिल्डिंगच्या बाहेरचा हा फोटो आहे. या फोटोतही मधुराणी कुल अंदाजात दिसतेय. व्हाइट जीन्स विथ पर्लपल टी-शर्टमध्ये मधुराणीने सिडनी टॉव्हर आय मधून हा फोटो क्लिक केलाय. या ती फार हॅप्पी दिसतेय. सिडनीच्या रस्त्यावरचा हा मधुराणीचा फोटो आहे. मधुराणीच्या या लुक्सना चाहत्यांची पसंती मिळाली आहे.