टेलिव्हिजनची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मालिकेतील ही मायलेकी गोड जोडी. मालिकेतील अरुंधती घराघरात प्रसिद्ध आहेच मात्र अरुंधतीची मुलगी इशाही तितकीच प्रसिद्ध आहे. अभिनेत्री अपूर्वा गोरे हिनं मालिकेत इशाची भूमिका साकारली आहे. अरुंधती सारखी नसली तरी तिच्याइतकीच गोड अशा तिच्या मुलीची भूमिका अपूर्वानं उत्तमरित्या साकारली आहे. प्रेक्षकांकडून इशाच्या भूमिकेला पसंती मिळत असते. इशा आणि अनिश यांचा डान्सही प्रेक्षकांना मागच्या भागात पाहायला मिळला. अभिनेत्री अपूर्वा गोरे प्रत्यक्षातही इशा इतकीच गोड आणि सुंदर आहे. अपूर्वा अभिनयाबरोबरच उत्तम डान्सही करते. अपूर्वाचं साड्यांवर विशेष प्रेम आहे. नुकतेच तिनं साडीतील फोटो शेअर केलेत. अपूर्वानं नेसलेली ही जांभळी साडी तिला अभिनेत्री सीमा घोगळेनं गिफ्ट केली आहे.