स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत सध्या अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाचे वारे वाहून लागले आहेत. नातीच्या बारश्यात अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची बातमी सर्वांना कळते. त्यानंतर आप्पा मी अरुंधतीचं लग्न लावून देणार असल्याचा त्यांचा निर्णय सांगतात. यावर अनघा, यश, संजना देखील पाठिंब देतात. अरुंधतीच्या लग्नाला देशमुखांच्या घरातील अर्ध्या लोकांना विरोध असला तरी अरुंधतीची पाठवणी ही देशमुखांच्याच घरातून होणार आहे. आप्पा अरुंधतीला, 'मला तुझी पाठवणी या घरातून करायची आहे. मला तुझं कन्यादान करायचं आहे', असं सांगतात. त्यावर अनिरुद्ध नेहमी प्रमाणे मध्ये पडतो आणि रागात 'अरुंधती लग्नाआधी इथे राहायला आली तर मी हे घर सोडून जाईन असं सांगतो'. अनिरुद्धच्या या बोलण्यानंतर ज्यांना माझा निर्णय मान्य नसेल त्यांनी खुशाल त्यांना काय करायचं आहे ते करावं, असा निर्णय आप्पा देतात. आप्पांनी घेतलेला हा निर्णय अरुंधती मान्य करून पुन्हा देशमुखांच्या घरी राहायला येणार का? हे पाहणं येणाऱ्या भागात महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे मोठ्या तावातावात घर सोडून जाईन म्हणणारा अनिरुद्ध अरुंधती आल्यावर घर सोडून जाणार का? हे पाहण्याची देखील सर्वांना उत्सुकता आहे.