Aai Kuthe Kay Karte: नातीच्या बारश्यात अरुंधती-आशुतोषच्या लग्नाची बोलणी; आई कांचन लावून देणार सूनेचं लग्न?
आई कुठे काय करते मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये छकुलीच्या बारशाला सगळे देशमुखांच्या घरी एकत्र येणार आहेत. अनघानं मात्र लेकीबद्दलचा तिचा सगळ्यांना सांगितला आहे.
आई कुठे काय करते मालिकेत सध्या आशुतोष आणि अरुंधतीच्या प्रेमाचे वारे वाहत आहेत. त्यात आता अनघाच्या बारशाला दोघांच्या लग्नाची बोलणी होण्याची शक्यता आहे.
2/ 10
दरम्यान छकुलीचं नाव कोणी ठेवायचं यावरून देशमुखांच्या तणाव निर्माण होतो. 'माझ्या मुलीचं नाव काय असेल हे मला न विचारता कोणीच नाही ठरवायचं', असं अनघा अभिला खडसावून सांगते.
3/ 10
त्यावर अभि म्हणतो, 'हा छकुलीच्या आयुष्यातला मोठा निर्णय आहे ना'. त्यावर अनघा त्याला 'मी तो निर्णय घेतलाय', असं सांगते.
4/ 10
'माझ्या मुलीचं नावं तिच्या आजीनं ठेवावं', असं अनघा सगळ्यांना सांगते.
5/ 10
त्यानंतर दुसऱ्या दिवशी छकुलीच्या बारशासाठी सुलेखा ताई, आशुतोष, अनिश आणि नितीन देशमुखांच्या घरी येतात.
6/ 10
घाई गडबडीत असलेली अरुंधती आशुतोष आणि सुलेखा ताईंना पाहून पटकन उठून त्यांच्या स्वागतासाठी जाते.
7/ 10
अरुंधतीला पाहून सुलेखा ताई भावुक होऊन तिला मिठी मारतात. त्यांच्या डोळ्यात होणाऱ्या सुनेबद्दल प्रचंड कौतुक दिसतं.
8/ 10
सुलेखा ताई आणि अरुंधतीची गळाभेट पाहून आई कांचन मात्र नाराज होते. आता छकुलीच्या बारशानंतर आशुतोष आणि अरुंधती यांच्या लग्नाची बोलणी होणार का? हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.
9/ 10
आई कांचन सूनेचं दुसरं लग्न लावून देण्यासाठी तयार होणार का? अरुंधती आई आप्पांना कसं समजवणार हे देखील पाहणं इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
10/ 10
आई कांचन सूनेचं दुसरं लग्न लावून देण्यासाठी तयार होणार का? अरुंधती आई आप्पांना कसं समजवणार हे देखील पाहणं इंट्रेस्टिंग ठरणार आहे.