छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका यामधील संजना म्हणजे अभिनेत्री रूपाली भोसले हिनं नुकतच पैठणीत फोटोशूट केलं आहे. रूपाली भोसलेचा पैठणीतील पारंपारिक साज पाहून चाहचे घायळ झाले आहेत. तिच्या अदा पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. रूपालीच्या फोटोंवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे. रूपाली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे विविध फोटो व व्हिडिओ ती शेअर करत असते. रूपाली तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. नेहमी हटके स्टाईलने ती चाहत्यांच मन जिंकते. कधीचा नथीचा नखरा तर कधी पारंपारिक साज तिचा पाहायला मिळतो. संजना हे नकारात्मक पात्र साकारत असली तरी रूपालीचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. नऊवारी साडीत देखील रूपाली खूपच सुंदर दिसत आहे.