

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आपले प्रेग्नेन्सीचे दिवस इन्जॉय करीत आहे. लवकरच सैफ आणि करिनाच्या घरात एक लहानसा पाहुणा आला आहे. म्हणजेच लवकरच तैमूर मोठा भाऊ होणार आहे. मात्र यादरम्यान तैमूरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.


तैमूर या फोटोमध्ये एका लहानशा बाळासोबत दिसत आहे. तैमूर बाळाला शेजारी घेऊन बसला आहे आणि तो खूप आनंदात दिसत आहे. तर एका दुसऱ्या फोटोमध्ये करिनानेदेखील या बाळासोबत फोटो क्लिक केले आहेत. यामध्ये करिनाचे बेबी बंप दिसत आहे. करिनादेखील या फोटोमध्ये खूप आनंदात दिसत आहे. या फोटोमध्ये तिने ब्लू रंगाचा लूज ड्रेस घातला आहे.


करिनाने आपल्या पर्सनल असिस्टंट पूनम दमानियाला घरी आमंत्रण दिलं होतं. यासाठी घरातचं छोटंसं दिवाळी सेलिब्रेशन ठेवण्यात आलं होतं. यादरम्यान हे फोटो क्लिक करण्यात आले आहेत. नैना सिंंहने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.


पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की, बेबो आम्हाला बोलवण्यासाठी धन्यवाद. सियाने आपला पहिला मित्र बनवला आहे. तुम्हाला दोघांना खूप प्रेम..याशिवाय नैना सिंहने पूनम दमालियालाही टॅग केलं आहे.