'तू माझा सांगाती' मालिकेला 8 वर्षे पूर्ण, अभिनेत्रीनं शेअर केली खास पोस्ट!
'तू माझा सांगाती' मालिकेला 8 वर्ष पूर्ण (8 years of tu maza sangati serial) झाली. याविषयी अभिनेत्री प्रमिती नरकेनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.
|
1/ 10
आजकाल मराठी मालिकेंची क्रेझ वाढत चालली आहे. मराठी मालिकांनाही प्रेक्षक भरभरुन प्रेम देतात. अशातच धार्मिक मालिकेंना प्रेक्षक जास्त पसंत करताना दिसतात. अशीच एक मालिका आपलं गेल्या आठ वर्षांपासून मनोरंजन करत आहे.
2/ 10
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘तू माझा सांगाती’ मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आठ वर्ष पूर्ण केले आहेत. याविषयी मालिकेतील अभिनेत्री प्रमिती नरकेनं (Prameeti narke) एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
3/ 10
'तू माझा सांगाती' मालिकेला 8 वर्ष पूर्ण झाली. तरीही रसिक प्रेक्षकांचं प्रेम अजूनही ओसंडून वाहतच आहे. हा जणू 'बुआंचा' (साक्षात तुकाराम महाराजांचाच) आशिर्वाद म्हणावा लागेल, असं फोटो शेअर करत प्रमितीनं म्हटलं आहे.
4/ 10
प्रमितीनं तू माझा सांगाती मालिकेला आठ वर्ष पूर्ण झाल्यासोबतच पंढरपूर वारीच्या निमित्ताने सर्व भाविकांना पालखीच्या खूप खूप शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
5/ 10
प्रमिती ‘तू माझा सांगाती’ या मालिकेमध्ये आवलीची भूमिका साकारताना दिसते.
6/ 10
आवली ही स्वभवाने स्पष्ट व्यक्ती तसेच व्यवहारी अशी होती. अशा प्रकारची भूमिका निभावणं हे खरंच खूप आव्हानात्मक आहे.
7/ 10
प्रमितीनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना तिच्या प्रेमात पाडलं आहे.
8/ 10
प्रमितीसोबत तुकोबांची मुख्य भूमिका चिन्मय मांडलेकर साकारताना दिसतात.
9/ 10
संत तुकारामाची भूमिका वठवणाऱ्या चिन्मय मांडलेकरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. आता या मालिकेद्वारे अवली म्हणजेच प्रमितीला देखील एक वेगळी ओळख मिळाली आहे.
10/ 10
प्रमितीनं अनेक नाटक, मालिकांमध्ये काम केलं आहे. यामधून ती घराघरात पोहचली.