साऊथ सुपरस्टार JR. NTR आता फक्त साऊथमध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय झाला आहे. सध्या त्याचा रामचरणसोबतचा बहुचर्चित RRR चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी तुफान कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ माजवला आहे.
2/ 8
JR. NTR चा मोठा चाहतावर्ग आहे. चाहते सतत त्याच्याबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतात. अनेक चाहते अभिनेत्याची लाईफस्टाईल, घर, कार या गोष्टींबद्दल जाणून घ्यायला उत्सुक आहेत. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
3/ 8
सर्वांनाच माहिती आहे की, JR. NTR हा साऊथचे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रावराम यांचा नातू आहे. आपल्या आजोबांसोबत JR. NTR ने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
4/ 8
JR. NTR 25 कोटींच्या घरात राहात आहे. त्याचं हे आलिशान घर हैद्राबादमधील जुबली हिल्स या ठिकाणी आहे. इतकंच नव्हे तर विविध ठिकाणी त्याची अनेक आलिशान घरे आहेत.
5/ 8
अभिनेता साऊथ बिग बॉसचं होस्टिंग करतो या रिएलिटी शोसाठी त्याला तब्बल 25 कोटी रुपये देण्यात आले होते.
6/ 8
JR. NTR ला महागड्या गाड्यांची आवड आहे. त्याच्याकडे अनेक कार आहेत. शिवाय अभिनेता 9999 हा क्रमांक लकी समजतो. लाखो रुपये खर्चून अभिनेत्याने हा क्रमांक मिळवला होता.
7/ 8
अभिनेता JR. NTR ने नुकतीच रिलीज झालेल्या RRR चित्रपटात भीमची भूमिका साकारली आहे.
8/ 8
या चित्रपटासाठी JR. NTR ने तब्बल 45 कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जातं.