

वानखेडे स्टेडियम...गच्च भरलेले मैदान...शेवटच्या षटकात महेद्रसिंह धोनी यानं मारलेला हेलिकॉप्टर शॉट...आणि भारतानं 28 वर्षांचा दुष्काळ संपला. हे चित्र कोणत्याही भारतीयांच्या मनावर जणू कोरलेलं आहे. आज भारताला विश्वचषक जिंकून आठ वर्षे पुर्ण झाली.


भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 19 फेब्रुवारी ते 2 एप्रिल या कालावधीत एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युवराज सिंग याच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारतानं पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांना नमवत फायनलमध्ये धडक मारली. आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे वर्ल्डकप विजयाच्या स्वप्नाकडे भारताने आगेकुच केली.


वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात महेला जयवर्धनेच्या 103 धावांच्या जोरावर श्रीलंका संघाने 6 बाद 274 धावा उभ्या केल्या. यावेळी कर्णधार कुमार संगकारानेही 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.


दरम्यान श्रीलंकेनं उभ्या केलेल्या धावांच्या डोंगरांचा पाठलाग करताना विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे दिग्गज स्वस्तात माघारी परतले. आणि स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली. घराघरातले टिव्ही बंद झाले. मात्र, गौतम गंभीरनं एकट्यानं खिंड लढवली. विराटसह 83 आणि महेंद्रसिंग धोनीसह चौथ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. मात्र, दुर्दैवानं 97 धावांवर गंभीर बाद झाला. [caption id=


या सामन्यानंतर युवराज सिंगसह सगळेच खेळाडू मैदानावर ढसा ढसा रडताना दिसले. यावेळी अनेक वेळा भारतीय संघाचा भार आपल्या खांद्यावर घेतलेल्या सचिनला खेळाडूंनी खांद्यावर घेत विजयी प्रदक्षिणा घातली.


करोडो भारतीयांच्या साक्षीनं भारतानं वर्ल्डकप उंचावला. यावेळी सचिनसह सर्व खेळाडूंना भरुन आले होते.