

पंढरपूर, 19 नोव्हेंबर : तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकीला सासरी पाठवताना कोणत्याही आई-बाबांचे डोळे पाणावतात. तिचे हट्ट पुरवत लहानाचं मोठं केलेल्या लेकीचा एक आगळा वेगळा पाठवणीचा सोहळा पंढरपुरात पाहण्यास मिळाला. शेतकरी असलेल्या बाबांनी आपल्या लेकीला हेलिकॉप्टरने सासरी पाठवलं.


आज अनेक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीचा तिस्कार करतात, अनेक मुलींचा जीव गर्भातच गुदमरून जातो. अशा वेळी समाजात मुलींविषयी जागृती निर्माण व्हावी.


त्याच बरोबर मुलीचा सन्मान देखील व्हावा या सामाजिक जाणिवेतूनच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील विजयसिंह देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयाने आज चक्क हेलिकाॅप्टरमधून मुलींची सासरी पाठवणी केली.


'हौसेला मोल नसतं' असं आपल्याकडे आजही म्हटलं जातं. परंतु, हौसे बरोबरच मुली प्रति असलेला जिव्हाळा आणि प्रेम देखील यातून देशमुख कुटुंबीयाने दाखवून दिले आहे.


कासेगाव येथील शेतकरी विजयसिंह देशमुख यांची पुतणी आणि जयसिंह देशमुख यांची मुलगी मंजुळा ही उच्चशिक्षीत असून तीचे बीडीएसपर्यंतचे शिक्षण झाले आहे.


कासेगाव येथील शेतकरी विजयसिंह देशमुख यांची पुतणी आणि जयसिंह देशमुख यांची मुलगी मंजुळा हिला पाठवणीसाठी नातेवाईकांनीही मोठी गर्दी केली होती.


या आगळवेळ्या पाठवणीचा हा सोहळा पाहण्यासाठी गावातील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी एकच गर्दी केली होती.