याच लेडी डॉननी रविवारीदेखील रस्त्यावरुन चालणाऱ्या एका महिलेला टक्कर मारल्यानंतर चाकूचा धाक दाखविला व धमकावण्याचा प्रयत्न केला. इंदूरमधील जवाहर मार्गावरील इमली साहेब गुरुद्वाऱ्यातून घरी दुचाकीवर परतणाऱ्या महिलांना मागून येत दोन तरुणींनी टक्कर मारली व वाद सुरू केला. यानंतर या दोघींनी त्यांना चाकू दाखवित धमकावण्यास सुरुवात केली.