

एक 24 वर्षीय तरुण आपल्या दोन पत्नीसोबत ऑनलाइन सेक्स शो करीत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ऑनलाइन सेक्स शोच्या माध्यमातून त्याने लाखो रुपये कमावले होते. अखेर शनिवारी मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुण विविध अॅप्सच्या माध्यमातून दोन्ही पत्नींसोबत लाइव्ह सेक्स शो करीत होता. पोलिसांनी त्याला मध्य प्रदेशातील विदिशा येथून अटक केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दुसऱ्या पत्नीने याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तरुणाला अटक करण्यात आली. पोलिसांनी तरुणावर बलात्कार आणि अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या पत्नीचा आरोप आहे की, तिचे इन्टिमेट क्षण ऑनलाइन दाखवित तरुणाने तिला टॉर्चर केलं. आरोपीच केवळ 10 वीपर्यंत शिक्षण झालं आहे. मात्र त्याला कम्प्युटरचं चांगल ज्ञान आहे.


तरुणाने अनेक डेटिंग अॅपवर प्रोफाइल तयार केलं होतं. त्याने आपल्या प्रोफाइलवर मेन्यू लावला होता. यानुसार तो विविवध व्हिडीओ आणि शोसाठी 500 ते हजार रुपयांपर्यंत चार्ज करीत होता. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार 28 ऑगस्ट रोजी सुरू केलेल्या अकाऊंटमध्ये तब्बल 6 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. तो दररोज 3 ते 4000 रुपयांची कमाई करीत होता.


तरुणाची पहिली पत्नी बंगळुरुत राहणारी आहे. सोशल मीडियावर भेट झाल्यानंतर त्याने आणखी एका महिलेशी लग्न केलं. उत्तर प्रदेशातील दुसरी पत्नी 7 महिन्यांची गर्भवती आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, त्याची दुसरी पत्नी धार्मिक आहे. तरुणाने तिला फसवलं व त्याच ती अडकली. पोलिसांनी सांगितले की, तरुणाच्या दोन पत्नी आहेत. मात्र या महिलांना पतीच्या दोन लग्नाबाबत माहिती नाही. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तरुणाने आपला गुन्हा कबुल केला आहे. तो दोन्ही पत्नींसोबत लाइव्ह सेक्स शो करीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या पत्नीला या कामाचा विरोध नव्हता. त्याने पहिल्या पत्नीला मोठ मोठी स्वप्न दाखवून असे कृत्य करण्यास तयार केले होते.