मंगळवारी हैद्राबादमधील पहाडी शरीफ या भागात ही घटना घडली. आरोपी नागार्जुन हा कुरनूर जिल्हयातील श्रीराम कॉलनीत राहतो. तो व्यवसायाने टॅक्सी ड्रायव्हर आहे. त्याची पत्नी वरालक्ष्मी हिचे नागार्जुन यांच्यासोबतचे संबंध वाढले होते. ती काटेदार इंडस्ट्रीयल भागात काम करत होती. कालांतरने त्या दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं.