वडिलांनी बाईक घेऊन दिली नाही म्हणून दोन भावांनी मिळून फेसबुकवरच्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. उत्तर प्रदेशातल्या बरेली इथली ही घटना असून त्याने सर्व जिल्ह्यात खळबळ माजलीय. दोन भावांनी वडिलांना बाईक घेऊन मागितली मात्र त्यांनी ती दिली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या भावांनी अघोरी उपाय केला. सहा दिवसांपूर्वीच Facebookवर मित्र झालेल्या एका त्यांनी भेटायला बोलावलं. येताना बाईक घेऊन ये असंही त्यांनी त्याला सांगितलं. तो भेटायला आल्यावर त्या भावांनी त्या मित्राला बियर पाजली. त्यात त्यांनी विष मिसळलं होतं. विषारी बिअर घेतल्यावर तो बेशुद्ध पडला त्यानंतर त्याचा गळा दाबून त्यांनी त्याची हत्या केली.