दोन मित्रांमधील पैशांच्या व्यवहारातील वाद इतका वाढला की, एका बदमाशांने तरुणाचं अपहरण करुन त्याला जंगलात घेऊन गेला आणि लग्नाच्या अवघ्या 3 दिवसांआधी त्याचं गुप्तांग कापलं. ही गंभीर घटना उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील आहे.
2/ 5
आरोप आहे की, पीडित तरुणाच्या मित्राने इतर दोन साथीदारांना सांगून आधीच त्याचं अपहरण केलं होतं. आणि त्याचं गुप्तांग कापलं. मित्राने त्याला त्याच अवस्थेत सोडलं आणि पळ काढला. सध्या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी हाय सेंटरमध्ये रेफर करण्यात आलं आहे.
3/ 5
ही घटना ईदगाम मोहल्ल्यातील असून येथे समीर नावाच्या तरुणाचा त्याचा मित्र परवेजसोबत एक लाख रुपयांवरुन वाद सुरू होता.
4/ 5
समीरचा आरोप आहे की, त्याचा मित्र परवेजचं नाव घेऊन त्याच्याजवळ दोन तरुण आले होते. आणि पैशांसाठी दबाव आणत होते. त्यानंतर, दोन तरुणांनी त्याला जबरदस्तीने आपल्यासोबत जंगलात नेलं आणि त्याचं गुप्तांग कापलं. शेवटी जखमी अवस्थेतच त्याला जंगलात सोडलं.
5/ 5
कसंबसं करुन समीरने याबाबत आपल्या कुटुंबापर्यंत माहिती पोहोचवली. यानंतर तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं. येथे त्याची प्रकृती पाहून हाय सेंटर मेरठमध्ये हलविण्यात आलं आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनुसार तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.