

मेरठ जनपदमधील मोदीपुरम येथील रुडकी रोडवरील एका हॉटेलमध्ये बुधवारी पोलिसांनी छापेमारी केली. पोलिसांनी छापेमारी करत 17 तरुणी-तरुणांना ताब्यात घेतले आहे. नवीन वर्षाच्या पार्टीच्या आड प्रेमी जोडप्यांचा रोमान्स सुरू होता. पोलिसांनी जोडप्यांना आक्षेपार्ह अवस्थेत ताब्यात घेतलं. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं असून चौकशी करीत आहेत.


शांति निकेतन कॉलनीच्या आत हॉटेलमध्ये नववर्षाच्या पूर्व संध्येला हॉलेट सजवलं होतं. कॉलनीतील लोकांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. पार्टीच्या आड हॉटेलमध्ये चुकीचं काम सुरू होतं.


पोलिसांनी छापेमारी करीत खोलीचा तपास केला. येथे अनेक जोडपे आपत्तीजनक अवस्थेत सापडले. पोलिसांनी 10 तरुण आणि 7 तरुणींना ताब्यात घेतलं आहे. हॉटेलच्या खोलीत दारुच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. यातील काही तरुण दारुच्या नशेत होते. कॉलनीतील लोकांनी घराच्या मालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.