

पोलिसांनी 21 वर्षीय एना लेकोविचला (Anna Leikovic) तिची आई प्रस्कोव्या लेकोविचची (Praskovya Leikovic) हत्येच्या आरोपात अटक केली आहे.


एनावर अद्याप कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. पोलिसांनी सांगितलं की, एना ही मुख्य संशयित आहे. मात्र अद्याप हत्येच्या कारणांची माहिती समोर आलेली नाही.


डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, एनाने स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या चाकूने पहिल्यांदा आपल्या आईवर वार केले आणि त्यानंतर ह्रदय व शरीराचे अवयव कापून वेगळे केले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला.


21 वर्षीय एना लेकोविच मेडिकलची विद्यार्थिनी आणि अपकमिंग इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर आहे. एनाच्या इन्स्टाग्रामवर (@leksaaam) 16.1 हजार फॉलोअर्स आहेत आणि ती नियमित आपले फोटो शेअर करत होती.


डेलीमेलच्या रिपोर्टनुसार एनाच्या आईला मुलगी ड्रग्ज घेत असल्याचा संशय होता. तिच्या उपचारामुळे त्या येथे आल्या होत्या. हत्येच्या मागेदेखील हेच कारण असल्याचे सांगितले जात आहे.


एनाच्या काकांनी आरोपाबद्दल सांगितलं की, प्रस्कोव्या आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करीत होती. त्या तिच्यासोबत जास्तीत जा्त वेळ घालविण्याचा प्रयत्न करीत होती.