ऑस्ट्रेलियामध्ये 57 वर्षांच्या महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्यानंतर तिची 27 वर्षीय मुलगी जेसिकाला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याची सुनावणी सुरू आहे. जेसिकाने आपल्या आईची 100 वेळा चाकूने भोसकून हत्या केली होती. सिडनी येथे राहणाऱ्या जेसिकाने कोर्टापुढे सांगितलं की, आईवर सातत्याने हल्ला करत होते आणि तिला चाकूने मारत होते. (फोटो साभार: रीटा केमिलेरी इंस्टाग्राम)
रिटाच्या दुसर्या मुलीच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, रीटा आपली मुलगी जेसिकाची मदत करू इच्छित होती आणि एकदा त्यांनी मुलीच्या शरीरातून भूत काढून टाकण्यासाठी 2500 डॉलर्स दिले होते, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. टोनीने सांगितलं की, या घटनेच्या आदल्या दिवशी रिटा आपली मुलगी जेसिकाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली होती. कारण जेसिका अनोळखी लोकांच्या घराचे डोअरबेल वाजवून वारंवार त्यांना शिवीगाळ करी होती. यानंतर, रीटा आणि जेसिकामधील तणाव वाढू लागला. (रिटा केमिलेरी इंस्टाग्राम)