

आतापर्यंत तुम्ही चोरीचे बरेच व्हिडीओ पाहिले आहेत. काही जणांनी फिल्मी स्टाइल चोरी केल्याचंही पाहिलं आहे. मात्र आता एक अशी चोरीची घटना समोर आली आहे, जी कदाचित तुम्ही कधी फिल्ममध्येही पाहिली नसेल.


हरयाणाच्या पानिपतमध्ये अशी चोरी झाली आहे, ज्यामध्ये शटरचं लॉक न तोडताच शटरमधूनच घुसून चोरट्यांनी दुकान लुटलं आहे. दुकानाच्या मालकालाही दुकानात गेल्यानंतर पैशांच्या गल्ल्याचं तुटलेलं टाळं आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर चोरी झाल्याचं समजलं.


दुकानाच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, सात ते आठ जण दुकानाच्या बाहेर आले. त्यापैकी काही जणांनी दुकानासमोर चादर धरली आणि इतरांनी शटर वर करून आपल्या एका सहकाऱ्याला दुकानाच्या आत घुसवलं. पैशांचा गल्ला तोडून त्यातून 86 हजार रुपये आणि काही मोबाईल चोरी केले.


चोरट्यांनी श्री गणेश कम्युनिकेशन आणि जॉकी और वॅन हुसैन नावाच्या शोरूममध्ये चोरी केली आहे. सोमवारी सकाळी चार ते सहाच्या दरम्यान ही चोरी झाली.