

हरयाणाच्या पानीपतमधील ही धक्कादायक घटना. एका महिलेला तिच्या पतीने तब्बल तीन वर्षे बाथरूममध्ये कोंडून ठेवलं. तो तिला मारहाण करायचा, खायलादेखील द्यायचा नाही. (फोटो - News18)


सनौलीमधील रिशपूर गावातील 35 वर्षांच्या रामरतिलाला तिचा पती नरेशने बाथरूममध्ये कोंडून ठेवलं, याबाबत तक्रार देण्यात आली. त्यानंतर जिल्हा महिला संरक्षण अधिकारी रजनी गुप्ता आणि सनौली पोलीस ठाण्यातील पोलीस तिथं मंगळवारी दाखल झाले. (फोटो - News18)


अधिकारी तिथं आले तेव्हा नरेश खेळत होता. त्याला पत्नीबाबत विचारलं असता आधी तो गप्प राहिला. मात्र नंतर त्याने ती पहिल्या मजल्यावर टॉयलेटमध्ये असल्याचं सांगितलं.(फोटो - News18)


टॉयलेटचं दार उघडताच धक्काच बसला रामरतिलाच्या शरीरात फक्त हाडांचा सापळा शिल्लक होता. तिचे कपडे पूर्णपणे अस्वच्छ झाले होते. इतके वर्षे बाथरूममध्येच राहिल्याने तिचे पायही वाकडेच राहिले आहेत.(फोटो - News18)


टॉयलेटमधून बाहेर येतातच सर्वात आधी तिनं खाण्यासाठी चपाती मागितली. महिलेला अंघोळ घालून, तिचे कपडे बदलून तिला खायला देण्यात आलं.(फोटो - News18)