मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणारं रॅकेट पकडण्यात आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मंगळवारी (24 जानेवारी) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 38 किलो सोनं जप्त केलं आहे. डीआरआयने कारवाईत जप्त केलेल्या सोन्याची किंमत जवळपास 21 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. तर 20 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली. हे तस्करीचं सोनं कोडवर्डच्या माध्यमातून स्थानिक ऑपरेटर्स यांना दिलं जाणार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सोनं लपविण्यासाठी ट्रॅव्हल बॅग, कापड किंवा इतर माध्यमांचा वापर केला जात होता. या प्रकरणात चौकशी दरम्यान एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.