तपासणी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ती कैद्याला प्रेम पत्रदेखील लिहित होती. ब्रिटेनच्या न्यायाधीशांनी स्कारलेटला या गुन्ह्यासाठी 10 महिन्यांचा तुरुंगवास सुनावला आहे. न्यायाधीशांनी सांगितलं की, तिच्या या कृत्यामुळे कैद्याला फायदा झाला आहे आणि तुरुंगाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यानंतर अन्य कैद्यांनी सांगितलं की, त्या कैदीबाबत स्कारलेट नेहमी चिंतेत होती आणि नेहमी त्याच्याशी बोलताना दिसत असे.