उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये बुधवारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. आरोपी जावेदने अत्यंत क्रूरपणे एका महिलेची हत्या केली. नसगिस जोरजोरात ओरडत होती. मात्र जावेद तिच्या गळ्यावरुन सुरा फिरवित राहिला. शेवटच्या श्वासापर्यंत जावेदने नरगिसला सोडलं नाही. हा भयंकर प्रकार पाहून लहान मुलंही बेशुद्ध झाले. नरगिसच्या जमिनीवर रक्त सांडलं होतं.
ही घटना ब्रह्यपुरीजवळील हरिनगर भागात घडली. सकाळी 9 च्या सुमारात इमरानच्या घरातून नरगिसच्या ओरडण्याचा आवाज येत होता. कोणाला काही कळायच्या आत नरगिसचा मृत्यू झाला. जावेदला लोक आधीपासून ओळखत होते. तो नियमित नरगिसच्या घरी यायचा. जावेद घरातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या हातात रक्त होतं. आणि घरात नरगिसचा मृतदेह पडला होता.
नरगिसच्या मुलांनी सांगितलं की, जावेद काकांनी आईला मारलं व तिच्या गळ्यावरुन सुरा फिरवला. तर पोलिसांच्या चौकशीत जावेदने सांगितलं की, नरगिससोबत तिचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे संबंध होते. त्याची पत्नी आणि दोन मुलं शास्त्री नगरमध्ये राहत होते. तर नरगिसचे पती दिल्लीत कपड्यांचं दुकान चालवत होते. नरगिसच्या मुलांचा सांभाळ जावेद करीत होता