

कर्नाटक पोलिसांनी शुक्रवारी एका 54 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर अत्यंत खळबळजनक असा आरोप लावण्यात आला आहे. या व्यक्तीने गेल्या 6 महिन्यांपासून 120 महिलांसह 200 हून अधिक लोकांना आपले NUDE फोटो पाठवले आहेत.


चित्रदुर्ग येथील चल्लकेरेच्या 54 वर्षीय निवासी रामकृष्ण याने कथित स्वरुपात 6 महिन्यात 120 महिलांसह 200 जणांना स्वत:चे न्यूड फोटो पाठवले आहे. एक आठवड्यापूर्वी काही लोकांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांना एका अज्ञात नंबरवरुन हे फोटो येत होते.


'द न्यूज मिनट' च्या एका रिपोर्टनुसार पोलिसांनी संगितले की, मिळालेल्या सूचनेच्या आधारावर पोलिसांनी रामकृष्णचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचा मोबाइल फोन ट्रॅक करण्याक आला. आणि शुक्रवारी त्याला चल्लकेरेस्थित त्याच्या घरातून अटक करण्यात आली.


पोलिसांच्या चौकशीदरम्यान रामकृष्ण याने फोटो पाठविल्याचे मान्य केले. पोलिसांनी सांगितले की त्याने अनोखळी नंबरवर आपले फोटो पाठवले. चल्लकेरे येथे कमीत कमी 50 महिलांना त्याने फोटो पाठवले आहेत.