उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील एका तरुणाने पहिल्यांदा तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केलं. याशिवाय धक्कादायक म्हणजे याचे फोटो व अश्लील व्हिडीओही शूट केला. हे सर्व व्हिडीओ आणि फोटो प्रियकराने आपल्या मित्रांना दाखवलं. मित्रांनी ही क्लिप मित्राच्या प्रेयसीला दाखवून तिला ब्लॅकमेल करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, याशिवाय आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पीडिताने पोलीस ठाण्यात प्रियकर आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी पीडितेचं लैंगिक शोषण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही पीडितेला देण्यात आली. मात्र एफआयआर दाखल केल्यानंतर जेव्हा पीडितेला बुलंदशहरातील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यासाठी आणण्यात आले, त्यावेळी तिने परीक्षण करण्यास नकार दिला.
पोलिसांनी पीडितेला कोर्ट मॅजिस्ट्रे समोर हजर केले. येथे पीडितेने या घटनेचा नकार दिला व कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. पोलिसांनी सांगितले की या प्रकरणात आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. ही घटना संशयास्पद आहे, मात्र कायद्यानुसार तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.