झारखंडमध्ये महिलेवरील अपराधाचं (Crime Against Women) प्रकरण समोर आलं आहे. पुन्हा एकदा महिलेवरील अत्यंत क्रूर प्रकार समोर आला आहे. (Gangrape in Chatra) ही घटना चतरातील हंटरगंज भागातील आहे. येथे एका विधवा महिलेसोबत तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला आहे. इतकच नाही तर नराधमांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा पार केल्या.
पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये स्टीलचा ग्लास घुसवल्याचंही सांगितलं जात आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चीड आणणारी ही घटना हंटरगंज प्रखंडमधील एका गावातील आहे. सांगितलं जात आहे की, गुरुवारी रात्री साधारण 11 वाजता तीन तरुणांनी गावातील एका 50 वर्षीय विधवा महिलेसोबत सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये चहा पिण्याचा स्टिलचा ग्लास घुसवला.
या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची तक्रार हंटरगंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. एसपी ऋषभ झा यांनी सांगितलं की, पोलिसांनी तिघांपैकी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पीडित महिलेवर हंटरगंज सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. रुग्णालयाचे प्रभारी आरोग्य पदाधिकारी डॉ. वेदप्रकाश यांनी सांगितलं की, पीडितेची हालत अत्यंत गंभीर आहे. सुदैवाने परिस्थिती नियंत्रण आहे. या धक्कादायक घटनेनंतर पुन्हा एकदा पोलीस प्रशानावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.