झारखंडमधील जामताडामध्ये अवैध संबंधात एका हत्येची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका ट्रक ड्रायव्हरच्या पत्नीचे अवैध संबंध होते. ज्यातून क्लिनरने हे हत्याकांड केलं आहे. आरोपीने हत्येचा प्लान नाशिकमध्ये तयार केला होता आणि कलकत्त्यात जाऊन त्याने हत्या केली. त्यानंतर झारखंडमध्ये मृतदेह फेकला. मृत ड्रायव्हर बिहारमधील बांका जिल्ह्याचा रहिवासी होता.
पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितलं की, क्लिनरने ड्रायव्हरची हत्या कलकत्त्यातील चमरेल पार्किंगमध्ये केली होती. यानंतर मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी तो ट्रक घेऊन इकडे-तिकडे फिरत होता. यादरम्यान मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर त्याने झारखंडच्या मार्गावर जामताडा रस्त्याच्या किनाऱ्यावर मृतजेह फेकून दिला आणि फरार झाला.
गावकऱ्यांना रस्त्यावर मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली, मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला. यानंतर काही दिवसात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीचं नाव विजय कुमार उर्फ आकाश यादव असल्याचं समोर आलं. हा बिहारमधील बांका जिल्ह्यातील भेलवा गावातील रहिवासी आहे.