होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. पण तरी देखील काही महाभागांना परिस्थितीच गांभीर्य लक्षात येत नसल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. तर सांगलीच्या पोलिसांची चांगलीच आयडिया लढवून या महाभागांना चांगलाच धडा शिकवला आहे.
2/ 5


घराबाहेर पडू नका, असं आवाहन करुनही घराबाहेर पडणाऱ्या महाभागसमोर सांगली पोलिसांनी हात टेकले आहे.
3/ 5


सोमवारी रात्री कुपवाड आणि जत भागात रस्त्यावर फिरणाऱ्याच्या हातात पोलिसांनी "मैं समाज का दुश्मन हूं, मैं घर पर नहीं रहूंगा" या वाक्याचे चक्क पोस्टर हाती दिले.
4/ 5


पोलिसांच्या या हटके प्रकारामुळे नागरिकांना कमीपणा वाटू लागला. आपला फोटो सगळीकडे पाठवला जाईल या भीतने जी लोकं सापडली त्यांनी बाहेर न पडण्याची हमी दिली.