वुहानमध्ये (Wuhan) पोहोचलेल्या या टीमनं चीनमध्ये चांगलं सहकार्य मिळतं आहे, पण तात्काळ परिणाम मिळण्याची अपेक्षा नाही, असं म्हटलं आहे. नवभारतच्या टाइम्सच्या वृत्तानुसार WHO च्या टीमच्या मते, आतापर्यंत जे आकडे मिळाले आहे ते कुणीच पाहिले नसतील. तसंच या टीमनं कोरोनाचा उद्रेक लॅबमधूनच झाला असावा ही शक्यताही नाकारली नाही.