लसीकरणात उद्यापासून सुरू होणार महत्वाचा टप्पा, कुणाला मिळणार कोरोना लस आणि कधी?
आत्ता पुन्हा एकदा 1 एप्रिल हा लसीकरणातील महत्वाचा टप्पा ठरणार आहे. 1 एप्रिलपासून यात मोठा बदल केला जाणार आहे.
|
1/ 9
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आणि गंभीर बाब म्हणजे सर्वात जास्त उद्रेक महाराष्ट्रात झालेला दिसून येत आहे.
2/ 9
या परिस्थितीत एक दिलासादायक गोष्ट म्हणजे यावर लस उपलब्ध झाली आहे. देशात 16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काळात फक्त आरोग्य कर्मचारी आणि इतर सार्वजनिक कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली होती.
3/ 9
त्यानंतर थोडा बदल करत 1 मार्चपासून 60 वर्षांवरील वय असणाऱ्यांंचं लसीकरण सुरू झालं आहे
4/ 9
आत्ता पुन्हा एकदा 1 एप्रिल हा लसीकरणातील महत्वाचा टप्पा ठरणार आहे. 1 एप्रिलपासून यात मोठा बदल केला जाणार आहे.
5/ 9
1 जानेवारीपासून 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वच नागरिकांना लस दिली जाणार आहे.
6/ 9
या बदलानुसार 1 जानेवारी 1977 च्या आधी तुमचा जन्म झाला असाल तर तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल.
7/ 9
पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही वयोमर्यादा वाढविण्याची विनंती केली होती.
8/ 9
45 वर्षाच्या वरील व्यक्तींना लस घेण्यासाठी आता फक्त नोंदणी करण्याची गरज आहे. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे 'कट ऑफ डेट' लक्षात ठेवणं. जी 1 जानेवारी 1977 आहे.
9/ 9
यासाठी लस घेण्याआधी प्रत्येकाला नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यानुसारचं लस कधी मिळणार, कुठे मिळणार हे निश्चित केलं जाईल.