

जगाला सध्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हवं आहे. आणि तो प्रश्न म्हणजे कोरोनावर लस केव्हा येणार? जगातले अनेक देश यावर संशोधन करत असून अनेक लशींच्या चाचण्या या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.


लस शोधल्याचा दावा करणारा रशिया हा पहिलाच देश आहे. मात्र रशियाच्या लशीवर जगाने आणि वैज्ञानिकांनी फारसा विश्वास दाखवला नाही.


ऑक्सफर्ड शोधत असलेल्या लशींवर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या लशीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असून आत्तापर्यंतचे सगळे निष्कर्ष हे उत्साहवर्धक आणि सकारात्मक आहेत. पुण्यातली सीरम या लशींचं उत्पादन करणार आहे.


श्रीमंत देशांनी या लशींच्या उत्पादनाला सुरूवातही केली आहे. प्रचंड पैसा आणि तुलनेने कमी लोकसंख्या असल्याने या देशांनी आत्तापासूनच त्या लशींचं बुकिंग आणि साठवणूक सुरू केली आहे.


अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांनी लोकसंख्येच्या तुलनेत लशींची पुरेसी तरतूद केली असल्याचं बोललं जात आहे.


तर भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या आणि विकसनशील देशांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तर गरीब देशांची परिस्थिती आणखी गंभीर आहे.


भारताला प्रत्येक नागरीकाला एक डोज द्यायचा द्यायचा असेल तर किमान 130 कोटींपेक्षा जास्त डोज लागणार आहेत. त्यामुळे त्याचा खर्च आणि उत्पादन हे मोठं आव्हान असणार आहे.