अलास्का (Alaska) मधील एक मध्यम वयाच्या महिलेला (आरोग्य कर्मचारी) फाइजर (Pfizer) कंपनीची कोविड-19 वॅक्सीन (COVID-19 Vaccine) दिल्यानंतर काही वेळातच तिला त्याचा त्रास होऊ लागला. तिला या लशीमुळे एलर्जी (Allergy) झाल्याचं समोर आलं आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एलर्जीचं औषध दिल्यानंतर तिची प्रकृती ठीक आहे. मात्र डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. फायजर कंपनीच्या कोविड-19 लस दिल्यानंतर अलास्कामधील एका महिलेमध्ये कर्मचारीला एलर्जीची तीव्र लक्षण दिसून आली. कोरोना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मध्यम वयाच्या महिलांना यापूर्वी कधी एलर्जीची तक्रार नव्हती. सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. कोरोना लशीनंतर ही परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी यूकेमध्येही आरोग्य कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. तेथे फायजरने कोरोना लशीला या महिन्याच्या सुरुवातीला परवानगी दिली होती.
यूकेच्या वैद्यकीय नियामकांनी असे म्हटले आहे की, जर कोणाला यापूर्वी एलर्जीचा त्रास असेल तर त्यांनी Pfizer-Biotech ची कोविड - 19 लस घेऊ नका. परंतु यूएस फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) म्हटले आहे की, एलर्जीचा इतिहास असणारी अनेक अमेरिकन नागरिक ही लस घेतल्यानंतर सुरक्षित आहेत. त्यामुळे असेही म्हटले आहे की, ज्या लोकांना या आधी लस घेतल्यानंतर एलर्जी झाली असेल त्यांनी ही लस टाळावी.
फायजरने सांगितलं की, या लशीवर स्पष्ट लिहिलं आहे की, याचा वापर केल्यानंतर जर एलर्जीची लक्षण दिसली तर तातडीने उपचार करावा. त्यानंतरही गरज वाटत असेल तर लशीच्या लेबलवर छापलेल्या सूचना अपडेट केल्या जातील. अमेरिकेत गेल्या आठवड्यापासून या लशीचा प्रयोग सुरू केला होता. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस लावली जात आहे.
एफडीएचे माजी मुख्य वैज्ञानिक गुडमॅन म्हणाले की, एलर्जिक रिएक्शन शिवाय अन्य धोका ओळखण्यासाठी आता सूचनांची आवश्यकता आहे. गुडमॅन यांनी सांगितलं की, आता हे पाहणं आवश्यक आहे की, लशीचा किती डोज दिला जावा आणि दुसऱ्या लशीसोबत ही दिल्यास याचं काय रिअॅक्शन पाहायला मिळेल. याची माहिती मिळाल्यानंतर याचा वापराबद्दलची माहिती दिली जाऊ शकते.