राज्यात सध्या कोरोनाच्या एकूण 65,41,762 रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णांपैकी 63,62,248 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट आता 97.26 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णवाढीचा दर आणि रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी झाला आहे. 27 सप्टेंबरच्या राज्याच्या आकडेवारीनुसार 37,043 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. 17 जिल्ह्यांत 100 पेक्षाही कमी सक्रिय रुग्ण आहेत. 17 पैकी 9 जिल्ह्यांत तर एक आकडीच अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. नांदेडमध्ये 9, वाशिममध्ये 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जळगाव, वर्ध्यात प्रत्येकी सहा तर गोंदिया यवतमाळमध्ये प्रत्येकी 5 सक्रिय रुग्ण आहेत. नंदूरबारमध्ये 3 तर धुळे, भंडाऱ्यात प्रत्येकी 2 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.