राज्यात आज 22,122 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत तर 361 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी घटली आहे.
2/ 8
काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीयरित्या घट झाली आहे. या जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
3/ 8
धुळ्यात 59 नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्येत झालेली ही मोठी घट आहे. एकूण रुग्णसंख्या 41735, एकूण मृत्यूचा आकडा 662 आहे. तर 40 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
4/ 8
वाशिममध्ये लॉक डाऊननंतर 17 मे पासून रुग्ण संख्या कमी झाली आहे. 17 मे रोजी 400 च्या वर आढणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या 23 मे रोजी 300 च्या खाली आली. 23 मे फक्त 270 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. पण मृत्यूचा आकडा मात्र वाढता आहे.
5/ 8
परभणीत 408 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत, तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 48809 आहे. 43920 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1210 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
6/ 8
जळगावात दिवसभरात 312 कोरोना रुग्ण सापडले आहेत. बाधितांची संख्या 138625 इतकी झाली आहे. आज रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत 2495 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 24 तासांत 897 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 128921 रूग्ण बरे झाले आहेत.
7/ 8
उस्मानाबादमध्येही 500, 400 पेक्षा जास्त असणारे रुग्ण 23 मे रोजी 392 वर आला आहे.
8/ 8
नांदेडमध्येही नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्यात चढ-उतार पाहायला मिळतो आहे. 14 मे रोजी 200 च्या पार असलेले रुग्ण 23 मे रोजी 103 वर आले. पण आता मात्र आकडा पुन्हा 200 च्या पार गेला आहे. 24 मे रोजी 210 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.