Unlock होत आहे मुंबई-पुणे, पण गाफील राहू नका, घराबाहेर पडताना नका करू या चुका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केल्याप्रमाणे काही ठिकाणी कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने मुंबई आणि पुण्याचा समावेश आहे. पण अनलॉक होत असलं तरी मुंबईकर आणि पुणेकर दोघांनीही काही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
|
1/ 10
कोरोनाच्या संकटात महत्त्वाची असलेली अस्त्रं म्हणजे मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग कोणत्याही परिस्थितीत विसरता कामा नये. याकडे दुर्लक्ष म्हणजे कोरोनाला संधी हे लक्षात ठेवायला हवे.
2/ 10
सरकारनं केवळ काही निर्बंध उठवले आहेत. पूर्णपणे लॉकडाऊन उठवलेला नाही. त्यामुळं घराबाहेर पडताना आपल्या भागामध्ये कोणत्या वेळेत काय सुरू राहणार आहे याची खात्री करून घ्या. प्रामुख्यानं वेळा पाळणं गरजेचं आहे.
3/ 10
मुंबई आणि पुण्यातही प्रामुथ्यानं सकाळी 7 ते दुपारी 2 या काळात दुकानं उघडणार आहेत. या वेळेनंतर दुकानं बंद होणार असली तरी ती दुसऱ्या दिवशी उघडतील. त्यामुळं घाई करू नका. त्यामुळं गर्दी आणि धोका दोन्ही वाढू शकतो.
4/ 10
शनिवार रविवारी वीकेंड लॉकडाऊन दोन्ही शहरांमद्ये सुरू राहणार आहे. त्यामुळं शनिवारी आणि रविवारी तुम्हाला केवळ अत्यावश्यक सेवाच उपलब्ध राहतील.
5/ 10
रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्या आणि स्टॉल्सना सकाळी 7 ते रात्री 8 या वेळात फक्त पार्सल देण्यास परवानगी. तिथे उभं राहून किंवा बसून खाता येणार नाही.
6/ 10
ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तूंची घरपोच सेवा देण्यास परवानगी आहे. त्यामुळं बाहेरची गर्दी टाळण्याचा हा चांगला पर्याय ठरू शकतो.
7/ 10
दुपारी 3 वाजेनंतर अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडणे टाळा. अन्यथा कारवाईचा सामना करावा लागू शकते. 3 नंतर पूर्वीप्रमाणेच संचारबंदी लागू असणार आहे.
8/ 10
मद्याच्या दुकानांवर प्रचंड गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं. पण सकाळी सात ते दुपारी दोन असा यासाठीही वेळ आहे, त्यामुळं एकाचवेळी गर्दी टाळा. त्यात घरपोच सुविधेचा लाभही घेता येईल.
9/ 10
बँका कामाच्या दिवशी सुरू राहणार आहेत. त्यामुळं बँकांची कामं खोळंबलेली असतील तरी सुरुवातीचे काही दिवस टाळा. कारण या काळात गर्दी होऊ शकते.
10/ 10
सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्दी ही कोरोनासाठी संधी आहे. सरकारनं निर्बंध शिथिल केल्यानं आपण गर्दी केली आणि कोरोना पुन्हा फोफावला तर पुन्हा सर्वकाही बंद होऊ शकते, याची जाणीव ठेवून गर्दी करणं टाळा.