देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. देशातील कोरोना प्रकरणं पुन्हा वाढू लागली आणि बहुतेक कोरोनाची प्रकरणं अचानक वाढल्यामुळे बहुतेक राज्यांनी लॉकडाऊन लागू केला.
2/ 11
महाराष्ट्रात 5 मार्चपासूनच लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यावेळी राज्यात 4 लाख 51 हजार 375 अॅक्टिव्ह केसेस होते. भारताच्या एकूण अॅक्टिव्ह प्रकरणांपैकी 60.85 टक्के एकट्या महाराष्ट्रात होती.
3/ 11
ज्या महाराष्ट्रात देशातील निम्म्या प्रकरणांपेक्षाही जास्त अॅक्टिव्ह केसेस होते, तिथं लॉकडाऊननंतर आता फक्त 16.50 टक्के केसेस आहेत.
4/ 11
उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरयाणा, तामिळनाडू, ओडिशा, राजस्थान, बिहार, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, जम्मू-कश्मीर आणि गोव्यातही लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लागू आहेत.
5/ 11
पश्चिम बंगाल, पंजाब, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आसाममध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे, नाइट कर्फ्यू आणि दिवसा अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
6/ 11
राज्यांमध्ये उचललेल्या या कठोर निर्णयामुळे देशाचं कोरोनाचं चित्र पूर्णपणे बदललं आहे. देशात दररोज 4 लाखांपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण मिळत होते. पण बुधवारी 3 लाख 48 हजार 421 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
7/ 11
19 ते 25 एप्रिल या आठवड्यात अॅक्टिव्ह केसेसची दरवाढ 15 टक्क्यांनी कमी झाली आहे. 26 एप्रिल ते 2 मे हा दर 21.32 टक्के होता जो गेल्या आठवड्यात 9.71 टक्क्यांवर आला आहे.
8/ 11
दर आठवड्याला दैनंदिन सरासरी रुग्णसंख्येचा आकडा सांगतो की लॉकडाऊनमुळे प्रकरणांवर नियंत्रण मिळवण्यात मोठी मदत झाली आहे.
9/ 11
1 मार्चला दैनंदिन रुग्णवाढ 1.68 टक्के होती. ती 5 ते 11 एप्रिलला वाढून 7.13 टक्क्यांवर पोहोचली पण गेल्या आठवड्यापासून हा आकडा पुन्हा घसरू लागला आहे.
10/ 11
गेले काही दिवस भारतात कोरोनाची झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे देशासाठी हा मोठा दिलासा आहे.
11/ 11
हा सर्व लॉकडाऊनचाच परिणाम आहे. तज्ज्ञांनीदेखील भारतात लॉकडाऊनच कोरोनाच्या वेगाला रोखण्याचा प्रभावी मार्ग आहे, असं सांगितलं आहे.