कोरोनामुळे जगभर सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. व्हायरसला दूर ठेवण्यासाठी सॅनिटायझर गरजेचं आहे. मात्र त्याचा अतिवापर आणि काळजी न घेता वापर केला तर ते जवावर बेतू शकतं. सॅनिटायझरमध्ये अल्कोहलचं प्रमाण जास्त असल्याने आग लागू शकते. त्यामुळे वापर करतांना ते आगीच्या संपर्कात यायला नको याची काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सॅनिटायझरमुळे आग लागून भाजल्याने मृत्यू झाल्याच्या काही घटना महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये घडल्या आहेत.