

आपण कुटंबात किंवा मित्रांसोबत राहतो तेव्हा एकमेकांच्या वस्तू वापरतो. पदार्थ, कपडे, सौंदर्य प्रसाधनं, गॅझेट्स वापरताना गरज असेल तर आपण त्या माणसाची परवानगीही घेत नाही. मास्कबाबतही तसंच होतंय, स्वच्छ धुतलेले एकमेकांचे मास्क वापरायला एकाच कुटुंबातल्या लोकांना काहीही गैर वाटत नाही. पण तज्ज्ञांचं मत आहे की तसं करणं योग्य नाही.


तुम्ही तुमचा मास्क का शेअर करू नका? एखादी वस्तू दुसऱ्याला दिल्यानी प्रेम वाढतं हे आपल्याला शिकवलं आहे पण जेव्हा मास्क दुसऱ्याला द्यायची वेळ येते तेव्हा क्षणभर ही शिकवण विसरा. मास्क ही खूप खासगी वस्तू आहे त्यामुळे स्वच्छ धुतल्यानंतरही तो दुसऱ्याला वापरायलं देणं अजिबात बरोबर नाही. मास्क हे तुमच्या अंतर्वस्र किंवा टूथब्रशसारखे आहेत जे केवळ तुम्हीच वापरायचे आहेत.


मास्क शेअर करण्यातला धोका जाणून घ्या. तुम्ही जरी तुमचा मास्क अगदी स्वच्छ धुतलात तरीही तो दुसऱ्याला वापरायला देणं चुकीचं आहे. मास्कनी आपण आपलं नाक आणि तोंड झाकून घेतो. त्यामुळे त्या मास्कमध्ये अनेक प्रकारचे जीवणू विषाणू लपलेले असू शकतात अगदी स्वच्छ धुतल्यानंतरही ते जिवंत राहू शकतात.


मास्क शेअर करण्यातला धोका जाणून घ्या. तोच मास्क तुम्ही दुसऱ्याला वापरायला दिलात तर त्या माणसाला संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो त्यातून वेगवेगळे आजार होऊ शकतात. मास्कने तुमचं नाक आणि तोंड पूर्णपणे झाकलं जाईल याची दक्षता घेतली तर संसर्गाचा धोका कमी होतो.


मास्क शेअर करण्यातला धोका जाणून घ्या. जर तुम्ही दुसऱ्याला मास्क दिला तर त्याच्या वापरण्याने तो सैल होऊन पुढच्यावेळी तुमच्या नाकावर घट्ट बसणार नाही आणि त्यातून तुमचं तोंड नाक उघडं राहून तुम्हाला संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच तुम्ही स्वत: साठी 2-3 मास्क विकत घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला ते कमी पडणार नाहीत आणि दुसऱ्याकडे मास्कसाठी हात पसरावे लागणार नाहीत.