

कोरोनाचं वॅक्सीन येण्यासाठी 2021 वर्ष उजाडेल. कोरोनासोबत राहण्याची सवय करून घ्यावी लागेल असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं.


WHO चे प्रमुख टेड्रॉस अडहॉनम गीब्रीएसुस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी ही माहिती दिली. जगभरात सर्वांनाच आता कोरोनासोबत राहायची सवय करून घ्यायला हवी असं ते म्हणाले.


लहान मुलं आणि वृद्धच नाही तर तरुणांनाही कोरोनाचा धोका असल्याचं आता समोर आलं आहे. कोरोनामुळे तरुणांचाही मृत्यू होऊ लागल्यानं जागतिक आरोग्य संघटनेनं हा इशारा दिला आहे.


कोरोनामुळे तरुणांचा मृत्यू होत नाही हा समज चुकीचा आहे. कोरोना हा तरुणांच्या इतर अवयवांवरही परिणाम करतो. आपल्याला कोरोनासोबत राहायला शिकायला हवं आणि आपल्यासोबत दुसऱ्यांची काळजी घ्यायला हवी.


तरुणांनाही कोरोनाचा धोका आहे. बऱ्याच देशांमध्ये कोरोनाचं सामन्य संक्रमण मानलं जातं. तरुणांना कोरोना देखील संसर्ग होऊ शकतो. तरुणांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी जास्त काळजी घ्यायला हवी.


तरुणांनी सोशल डिस्टन्स, मास्क वापरणं, सॅनिटायझरचा वापर योग्य पद्धतीनं करायला हवा. अमेरिका, ब्राझील, भारत, दक्षिण आफ्रिका आणि कोलंबियामधील बिघडत्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.