महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून हळूहळू मुक्त होतो आहे. गेले काही दिवस राज्यातील कोरोनाची दिलासादायक अशी आकडेवारी समोर येते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे.
2/ 8
12 एप्रिलला राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त होती. एका दिवसात 46,781 नवीन रुग्णांचे निदान झालं तर 58,805 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
3/ 8
राज्यात आतापर्यंत एकूण 46,00,196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.01 टक्के इतकं झालं आहे. राज्यात सध्यस्थितीत एकूण 5,46,129 सक्रिय रुग्ण आहे.
4/ 8
फक्त राज्याच्या आरोग्य विभागाचीच नव्हे तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारीही महाराष्ट्रातील दिलासादायक परिस्थिती दाखवते. केंद्र सरकारने गेल्या दोन आठवड्यांतील देशाचा कोरोना रिपोर्ट जारी केला आहे.
5/ 8
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा पॉझिटिव्ही रेट हा 21.5 टक्के आहे. पण 15 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या 24 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र अठराव्या स्थानी आहे.
6/ 8
दैनंदिन रुग्ण संख्या कमी होणाऱ्या पहिल्या 18 राज्यांमध्येही महाराष्ट्राचा समावेश आहे. गेले काही दिवस राज्यातील नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसते आहे.
7/ 8
ज्या नागपूर, नाशिक आणि ठाण्यात कोरोनाची प्रकरणं झपाट्याने वाढत होती. तिथं गेली दोन आठवडे प्रकरणं कमी होत असल्याचं दिसतं आहे.
8/ 8
आता मात्र राज्यातील एका जिल्ह्याने राज्यासह केंद्राचंही टेन्शन वाढवलं आहे आणि तो जिल्हा म्हणजे अहमदनगर. जिथं गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसतो आहे.