एकाच दिवशी अमेरिका, ब्रिटन आणि पुण्यातून झाल्या 3 महत्त्वाच्या घोषणा; कोरोना लशीसंदर्भात आजचा दिवस ठरला मोठा
कोरोना लशीसंदर्भात (Corona vaccine) तीन Good News एकाच दिवशी आल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि एक बातमी आली आहे पुण्यातून. Covid साथीच्या दहशतीत दिलासा देणारे अपडेट्स
|
1/ 8
Corona Vaccine बाबत सोमवार 16 नोव्हेंबरचा दिवस मोठा ठरला. कारण कोरोना लशीच्या संदर्भात तीन मोठ्या बातम्या जाहीर झाल्या.
2/ 8
लस संशोधना आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या मॉडर्ना (Moderna) कंपनीनेही आपल्या लस यशस्वी ठरल्याचा दावा केला असून ही लस 94 टक्के परिणामकारक ठरल्याचं म्हटलं आहे.
3/ 8
ब्रिटननेही मोठी बातमी देत, Pfizer COVID-19 vaccine महिन्याभरातच येईल, असं सांगितलं. ब्रिटनचे मंत्री मॅट हँकॉक यांनी ख्रिसमसपूर्वीच लस येईल, अशी आशा व्यक्त केली.
4/ 8
पुण्यातून तिसरी मोठी गुड न्यूज आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने आतापर्यं 6 कोटी लशीचे डोस तयार केले आहेत.
5/ 8
आतापर्यंत Covid-19 शी लढा द्यायला आवश्यक कोरोना लशींची इथकी सकारात्मक आणि आशादायक बातमी आलेली नव्हती.
6/ 8
रशियाची Sputnik V लस ठरली 92% परिणामकारक असल्याचंही गेल्याच आठवड्यात जाहीर झालं.
7/ 8
2020 मध्येच लशीचे 50 दशलक्ष आणि 2021 मध्ये 1.3 अब्ज डोस जगाला पुरवू अशी आशा आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे.
8/ 8
विशेष म्हणजे जगातील ही पहिली लस आहे, ज्या लशीची चाचणी लहान मुलांवरदेखील करण्यात आली आहे.