देशात जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यासाठी व्यापक स्तरावर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सर्व प्रौढ नागरिकांसाठी म्हणजेच 18+ लोकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं. पण लसीकरणाचा वेग मात्र मंदावला आहे.
2/ 7
अनेक राज्यांमध्ये कोरोना लशीचा तुटवडा जाणवला आणि त्याचा परिणाम देशातील एकंदर कोरोना लसीकरणावर झाल्याचा दिसतो आहे.
3/ 7
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये जेव्हा 45+ नागरिकांना कोरोना लस देण्यात आली तेव्हा 8.98 कोटी डोस दिले केले. पण मे महिन्यात हा आकडा 6.10 कोटीवर आला आहे. म्हणजे लसीकरण जवळपास 32 टक्क्यांनी घटलं आहे.
4/ 7
मे महिन्यात तर दैनंदिन कोरोना लसीकरणही कमी झालं आहे. एप्रिलमध्ये दररोज 29.95 लाख लशीचे डोस दिले जात होते. मे महिन्यात फक्त 19.69 लाख दैनंदिन डोस देण्यात आले आहेत. दैनंदिन लसीकरण 34 टक्क्यांनी घटलं आहे.
5/ 7
एप्रिलमध्ये 13 दिवस दैनंदिन सर्वाधिक 30 लाखांपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण झालं. पण मे महिन्यात फक्त दोन दिवसच इतक्या प्रमाणात लसीकरण झालं. (Image credit/pexels-nataliya-vaitkevich)
6/ 7
दरम्यान जूनमध्ये लसीकरण वेग धरण्याची शक्यता आहे. कारण अनेक लस उत्पादकांनी आपल्या लशींचं उत्पादन वाढवलं आहे. शिवाय आणखी काही नवीन लशीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
7/ 7
जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत 136 दिवसांत एकूण 21.60 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 4.48 कोटी नागरिकांना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर 17.12 लोकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे.