याआधी मागील आठवड्यातच सिप्लानं कोविडची चाचणी करण्यासाठी नवीन RT-PCR कीट 'ViraGen' लॉन्च करण्याची घोषणा केली होती. कंपनीचं असं म्हणणं आहे, की यामुळे कोरोना रिपोर्ट तात्काळ समजू शकेल. हे कीट 25 मेपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. सध्या देशात कोरोना रिपोर्ट येण्यास बराच वेळ लागत असल्यानं रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये हे कीटही रुग्णांसाठी अत्यंत उपयोगी आणि वरदान ठरणार आहे.