UPSC परीक्षेत सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे डोकं शांत ठेवून मन लावून अभ्यास करणं. असा अभ्यास केला तर केवळ 4 ते 5 तासांचा अभ्यासही पुरेसा होतो आणि त्यातूनही यश खेचून आणता येतं हे वाराणसीच्या अर्तिका शुल्कानं सिद्ध करून दाखवलं
2/ 6
दोन्ही भाऊ UPSC देऊन वेगवेगळ्या पदावर आणि वडील डॉक्टर असल्यानं घरातूनच UPSCच्या परीक्षांचं तिला मार्गदर्शन मिळालं. अर्तिकाचं शालेय शिक्षण वाराणसीत झालं. पहिल्यापासूनच शाळेत पहिल्या नंबरात असणाऱ्या अर्तिकाला हाती घेतलेलं काम अत्यंत कुशल आणि हुशारीनं पूर्ण करण्याची सवय होती.
3/ 6
अर्तिकानं कोचिंग क्लासची नाही पण आपल्या दोन्ही भावांची मदत या परीक्षेसाठी घेतली. दोन्ही भावांच्या मार्गदर्शनाखाली 2015 च्या UPSC परीक्षेत तिने देशात चौथा क्रमांक मिळवला. 12 महिन्यांच्या तयारीत अर्तिकानं हे यश कसं खेचून आणलं जाणून घेऊया.
4/ 6
अर्तिकानं 12 महिन्यांचं नियोजन आखलं. प्री परीक्षेसाठी तीन तास तर मेन्ससाठी 1 तास असं नियोजन करून अभ्यास केला. दहावीपर्यंत गणित आणि इंग्रजी आपण नीट अभ्यास केला तर प्री परीक्षेत अॅप्टीट्यूट टेस्ट पास होणं कठीण नाही.
5/ 6
GK आणि आवांतर वाचन वाढवण गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्नाच्या मुळापर्यंत माहिती घ्यायला हवी. किमान 25 टेस्टपेपर घड्याळ लावून सोडवायला हवेत. सातत्य आणि डोक शांत ठेवून अभ्यास करायला हवा.
6/ 6
ही परीक्षा आपला निश्चय, पर्सनालिटी आणि कॉन्फिडन्स तपासणारी आहे. त्यामुळे मुलाखतीमध्ये कशा पद्धतीनं आपण उत्तरं देतो त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. घाबरून जाऊ नका या भीतीमधून स्वत:ला कायम सकारात्मक प्रेरणा द्या असा सल्ला अर्तिका शुल्काने दिला आहे.