Degree ची बिलकुल गरज नाही; विना पदवी लाखो रुपये पगार मिळणारी नोकरी
नोकरी करायची असेल तर पदवी (Degree) लागतेच, असा आपला समज असतो; पण काही क्षेत्रं अशी असतात, की जिथे तुमच्या डिग्रीपेक्षा कौशल्याला (Skill) जास्त महत्त्व असतं. अशाच काही विना डिग्री देखील मिळणाऱ्या नोकऱ्यांची (Jobs) माहिती घेऊ या, ज्या करण्यासाठी विद्यापीठाची डिग्री (University Degree) असण्याची गरज नाही.


केवळ भारतच नव्हे तर जगभरातल्या विविध देशांमध्ये चांगली नोकरी मिळवण्यासाठी विद्यापीठाची डिग्री असणं अत्यावश्यक असतं. अशा अनेक नोकऱ्या असतात जिथं डिग्रीशिवाय तुम्ही अर्जच करू शकत नाही. पण कोणत्याही डिग्रीशिवाय तुम्हाला चांगल्या उत्पन्नाची नोकरी मिळू शकते, असं सांगितलं तर तुम्हाला पटेल का? अशी अनेक क्षेत्रं असतात, जिथं तुमच्या डिग्रीपेक्षा जास्त महत्त्व तुमच्या कौशल्याला असतं. ती विशिष्ट क्षमता तुमच्याकडे असण्याला महत्त्व असतं. या नोकऱ्या कोणत्या विशिष्ट कोर्सशिवायही करू शकता. (फोटो : सोशल मीडिया)


या यादीत सर्वांत पहिलं नाव आहे एथिकल हॅकर्सचं. एथिकल हॅकर म्हणजे अशी व्यक्ती की जी एखादी व्यक्ती किंवा कंपनीच्या वेबसाइटची सुरक्षितता तपासण्यासाठी त्यांची वेबसाइट हॅक करते. एथिकल हॅकर हे हॅकिंग करून काही चोरत नाही, तर कंपन्या स्वतःच हे काम त्यांच्याकडे सोपवतात. त्यातून त्या कंपन्यांना कळतं, की त्यांच्या वेबसाइटची सुरक्षितता किती चांगली अथवा वाईट आहे. कॉलेड ड्रॉपआउट व्यक्तीही एथिकल हॅकिंग करू शकते. त्यासाठी कॉम्प्युटर क्षेत्रातल्या डिग्रीची आवश्यकता नाही. एथिकल हॅकरची वार्षिक कमाई 69 लाखांपर्यंत असू शकते. (फोटो: सोशल मीडिया)


शोफर म्हणजे अशी व्यक्ती, जिला कार चालवण्यासाठी नोकरीवर ठेवलं जातं. शोफर खासकरून महागड्या आणि मोठ्या गाड्याच चालवतात. त्यामुळे श्रीमंत व्यक्ती त्यांना नोकरीवर ठेवतात. ड्रायव्हर आणि शोफर यांच्यामध्ये हा फरक आहे, की ड्रायव्हर कोणीही असू शकतं; पण शोफर म्हणजे अशा प्रोफेशनल व्यक्ती, ज्यांना त्याच कामासाठी नोकरीवर ठेवलं जातं. अशा अनेक कंपन्या आहेत, की ज्या आपल्या क्लायंट्सना शोफर पुरवतात. शोफर बनण्यासाठीही डिग्रीची आवश्यकता नसते. शोफरची वार्षिक कमाई 47 लाख रुपयांपर्यंत असू शकते. (फोटो - सोशल मीडिया)


रिअल इस्टेट एजंट म्हणजे अशी व्यक्ती, जी घरं आणि अन्य मालमत्ता विक्रीमध्ये मध्यस्थ म्हणून काम करते. हे एजंट ज्यांना घर किंवा प्रॉपर्टी विकायची आहे किंवा खरेदी करायची आहे, अशा व्यक्तींच्या संपर्कात राहतात. त्या दोन्हींमधला दुवा बनतात. रिअल इस्टेट एजंट बनण्यासाठी तुम्हाला केवळ एका लायसेन्सची गरज असते. या एजंट्सची कमाई व्यवहाराच्या रकमेवर अवलंबून असते पण त्यांचं वार्षिक उत्पन्न 40 लाखांपर्यंत असू शकतं. (फोटो - सोशल मीडिया)


कुरियरचं काम खूपच महत्त्वाचं असतं. ही सेवा कुणीही सुरू करू शकतं. त्यासाठी विशिष्ट डिग्रीची आवश्यकता नाही. वार्षिक 37 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न कुरियर सेवेमधून मिळू शकतं. (फोटो - सोशल मीडिया)


गुन्ह्यांच्या संदर्भात खासगी पातळीवर तपास करणारी व्यक्ती म्हणजे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेटर. हे काम करण्यासाठी लायसेन्स असणं आवश्यक असतं आणि कायद्यांची माहिती असावी लागते पण यासाठी कोणतीही विशिष्ट डिग्री गरजेची नाही. आपला आपण अभ्यास करून या गोष्टी शिकता येतात. यातून वार्षिक 36 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. (फोटो - सोशल मीडिया)


तुम्ही खवय्ये असाल आणि खाद्यपदार्थ बनवण्याची चांगली माहिती तुम्हाला असेल, तर तुम्ही फूड टेस्टर म्हणून नोकरी करू शकता. त्या क्षेत्रात तुमचं नाव झाल्यावर वेगवेगळी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट तुम्हाला त्यांच्याकडचे खाद्यपदार्थ टेस्ट करण्यासाठी आमंत्रित करू शकतात. या कामातून वार्षिक 34 लाख रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते. (फोटो - सोशल मीडिया)


अर्थात कचरा किंवा टाकाऊ वस्तूंचं व्यवस्थापन ही आजच्या जगात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हे कौशल्य स्वतः काम करून, अभ्यास करून मिळवता येतं. हे काम करण्यासाठी विशिष्ट डिग्रीची आवश्यकता नसते. या क्षेत्रातल्या व्यक्तींना वार्षिक 33 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. (फोटो - सोशल मीडिया)


घरातील नळ किंवा पाणीपुरवठा यंत्रणेतील बिघाड दुरूस्त करणारी व्यक्ती म्हणजे प्लंबर. आजकाल अनेक खासगी कंपन्या प्लंबर पुरवण्याचं काम करतात. यासाठी कोणत्याही विशिष्ट डिग्रीची आवश्यकता नसते. या क्षेत्रात वार्षिक 31 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. (फोटो - सोशल मीडिया)


सेल्स एक्झिक्युटिव्ह बनण्यासाठी अनेक खासगी कंपन्या सेल्स क्षेत्रातली एमबीए किंवा अन्य डिग्रीची असण्याची पूर्वअट ठेवतात. पण सेल्समन बनण्यासाठी डिग्रीची गरज नसते. तुम्ही तुमच्याकडच्या वस्तू समोरच्याला कशा विकू शकता, हे एक कौशल्य असतं. ते कौशल्य तुमच्याकडे असेल तर वार्षिक 29 ते 30 लाख रुपये उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं. (फोटो - सोशल मीडिया)