पूजा यादव ही मूळची हरियाणाची आहे. 20 सप्टेंबर 1988 रोजी जन्मलेल्या पूजा यादवने हरियाणामधून सुरुवातीचे शिक्षण घेतले. तिने बायोटेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजीमध्ये एमटेक केले. एमटेक केल्यानंतर ती कॅनडाला गेली. काही वर्षे कॅनडामध्ये काम केल्यानंतर ती जर्मनीला गेली. परदेशी नोकरीत पैसा होता, सोयी होत्या. पण पूजाचे समाधान झाले नाही. नोकरी सोडून ती भारतात परतली.
पूजाला आयपीएस अधिकारी होण्याचा निर्णय घेणे खूप कठीण होते. कारण ती तिचं यशस्वी करिअर तिला सोडावं लागलं. पूजाच्या कुटुंबाने पाठिंबा दिला पण आर्थिक पाठबळ देऊ शकले नाही. अशात पूजा यांनी एमटेकचा अभ्यास करत असताना आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करत मुलांना शिकवणी शिकवली आणि खर्च भागवण्यासाठी रिसेप्शनिस्ट म्हणूनही काम केले.