जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हालाही उच्च शिक्षणासाठी (Higher studies in foreign) जायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही परदेशात शिक्षणासाठी जाण्याआधी तपासून घेणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया.
2/ 6
परदेशातून उच्च शिक्षणाच्या नावाखाली अनेक प्रकारचे घोटाळे होत आहेत. यामुळे तुमची बँक बॅलन्स रिकामी होऊ शकते. काही मार्ग जाणून घ्या, ज्याद्वारे तुम्ही हे घोटाळ टाळू शकता.
3/ 6
सर्व प्रथम, ते महाविद्यालय खरोखर त्या देशात आहे की नाही ते शोधा. कोणत्याही महाविद्यालयात प्रवेशाचे आश्वासन देऊन अनेक एजंट विद्यार्थ्यांची फसवणूक करतात. हे टाळण्यासाठी, कॉलेजच्या अधिकृत वेबसाइटला पूर्णपणे भेट दिल्यास मदत होऊ शकते.
4/ 6
परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घ्या. त्यानंतरच तुमची कागदपत्रे जमा करा.
5/ 6
व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखालीही अनेक एजंट फसवणूक करतात. परदेशात अभ्यास करण्यासाठी, सर्वकाही पूर्णपणे कायदेशीर आणि योग्य मार्गाने करा.
6/ 6
तुम्ही एज्युकेशन लोन घेत असाल तर स्वतः बँक अधिकाऱ्यांना भेटा आणि संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या. फक्त एजंटवर अवलंबून राहू नका