‘मोठी झाल्यावर समाजासाठी काही तरी करेन,’ असं दहा वर्षांची असतानाच आईला ठणकावून सांगणाऱ्या शुक्ला यांचा प्रवास खूपच संघर्षमय आहे. त्यांनी त्यांच्या गावातील तरुण मुली स्वतःच कुटुंब सोडून शहरात काम करायला जातात, किंवा शहरात गेलेल्या या मुलींची फसवणूक होते, त्यांना वेश्याव्यवसायात विकले जाते, असं ऐकलं होतं. हा प्रकार रोखण्याचा शुक्ला यांनी मनोमन निश्चिय केला.
समाजासाठी काहीतरी चांगलं काम करण्याच्या दृष्टीनं वयाच्या 15 व्या वर्षी वडिलांच्या पाठिंब्यानं शुक्ला यांनी प्रवास सुरू केला. त्यांनी ब्युटीशियनच्या कोर्सचे पैसे देण्यासाठी सायकल विकली. वयाच्या 16 व्या वर्षी वधूचा मेकअप करायला सुरुवात केली, आणि जेव्हा त्यांना पहिल्यांदा मेकअप केल्यानंतर 2500 रुपये मिळाले, तेव्हा त्यांनी गरजूंना मदत करण्यासाठी ते पैसे खर्च केले
2010 मध्ये या मुलींशी शुक्ला यांनी संपर्क केला, व त्यांना मेकअपचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मेकअपपासून आयब्रोपर्यंत सर्वकाही त्या विनामूल्य शिकवू लागल्या. या साठी आवश्यक साहित्यही शुक्ला यांनी स्वतः आणलं. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलींना मेकअपसाठी ग्राहक शोधण्यास मदत केली. यामुळे आज सुमारे 5000 मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या आहेत.