रॉबर्ट फ्रॉस्ट - (Robert Frost) प्रसिद्ध अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट एकेकाळी हॉर्वर्ड विद्यापीठाचे (Harvard University) विद्यार्थी होते. ते म्हणाले होते की, 'विद्यापीठ आपल्यामधून विद्यार्थी बनवू शकत नाही.' फ्रॉस्ट यांनी 1897 ते 1899 पर्यंत हावर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. पदवी न मिळवताच त्यांनी शिक्षण सोडले होते. पण फ्रॉस्ट यांना जेव्हा कवी म्हणून मान्यता मिळाली तेव्हा हॉर्वर्ड विद्यापीठाने 1937 साली त्यांना सन्मानित केलं होतं. (Photo: Wikimedia Commons)
डेव्हिड फॉस्टर वॉलेस (David Foster Wallace) डेव्हिड फॉस्टर वॉलेस हे अमेरिकेतील प्रसिद्ध कादंबरीकार आहेत. 'इनफिनिट जेस्ट', 'धीस इज वॉटर' आणि 'द पॅल किंग' या प्रसिद्ध कादंबऱ्यांचं लेखन त्यांनी केलं आहे. डेव्हिड फॉस्टर वॉलेस हे इंग्रजी विषयाचे प्रोफेसर होते तरी त्यांना तसं म्हणवून घेणं आवडत नसे. हॉर्वर्ड विद्यापीठाचा फिलॉसॉफीचा विद्यार्थी म्हणून डेव्हिड म्हणाले की, 'वास्तविक हे स्पष्ट आहे की मी त्या जगापासून खूप दूर होतो. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, 'हॉर्वर्ड विद्यापीठात जाणं ही माझी मोठी चूक होती.' विद्यापीठातील फूल-टाईम शेड्यूलमुळे त्यांना लिहायला वेळ मिळाला नाही. नैराश्यानं ग्रासल्यामुळं त्यांनी हॉर्वर्ड विद्यापीठ सोडून दिलं. (Photo: Wikimedia Commons)
जेम्स पार्क (James Park) - जेम्स पार्क हे फिटबिटचे संस्थापक आणि सीईओ आहेत. जेम्स पार्क हे 2015 या वर्षामधील अमेरिकेतील 40 वर्षांखालील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. जेम्स पार्क हे देखील हॉर्वर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी होते. जेम्स पार्क यांना Nintendo Wii combined sensors या सॉफ्टवेअरमुळे प्रेरणा मिळाली. याच माध्यमातून त्यांनी 2007 मध्ये एरिक फ्रीडमॅनसोबतच फिटनेस ट्रॅकर फिटबिटची स्थापना केली. (Photo: Twitter)
मॅट डेमॉन (Matt Damon) - मॅट डेमॉन हा सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आहे. 'गुडविल हंटिंग' या चित्रपटासाठी मॅट डेमॉनला बेस्ट स्क्रीनप्लेसाठी अकॅडमी अवॉर्ड मिळालं आहे. 1997 मध्ये तो हॉर्वर्ड विद्यापीठाचा विद्यार्थी होता. मॅट डेमॉनने इंग्रजी विषयाचे शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता. मॅट डेमॉनची क्लास असाइनमेंट होती ज्यामध्ये त्याने रॉबिन विलियम्सद्वारे अभिनीत चित्रपट 'गुडविल हंटिंग' यासाठी त्याच्या समीक्षकाद्वारे प्रशंसित चित्रपटाचं एक प्रारूप लिहिलं होतं. दरम्यान, 'गेरोनिमोः अॅन अमेरिकन लीजेंड' या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी शेवटच्या वर्षी तो विद्यापीठातून बाहेर पडला. (Photo: Reuters)
मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) - फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने देखील हॉर्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. आज आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेल्या फेसबुकची निर्मिती त्याने केली आहे. मार्क झुकरबर्गने 2002 ते 2004 या कालावधीत हॉर्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. त्याने हॉर्वर्ड विद्यापीठातून मानसशास्त्र आणि कम्प्युटर सायन्सचा कोर्स केला आहे. (Photo: Reuters)
बोम किम (Bom Kim) - Coupang Inc लॉन्च करणाऱ्या बोम किम यांनी प्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. दक्षिण कोरियामध्ये ज्याला अॅमेझॉनच्या नावानं ओळखलं जातं. दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये जन्म झालेल्या बोम किम यांचे कुटुंबीय ते सात वर्षांचे असतानाच अमेरिकेत स्थायिक झाले होते. (Photo: Reuters)